न. प पाठोपाठ तहसील कार्यालयावर ही प्रभारीराज

mhcitynews
0

तुळजापूर तहसीलचा कारभार निम्म्या कर्मचाऱ्यावर विध्यार्थी व नागरिकांची गैरसोय 

तुळजापूर प्रतिनिधी

नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आता विविध अभ्यासक्रमात प्रवेशासाठी पालक आणि विद्यार्त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. तत्पूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव महत्त्वाची असून त्यासाठी धावपळ वाढली आहे. पुढील प्रवेशासाठी लागणारी शासकीय कागदपत्रे हे तालुक्याचे ठिकाण असलेल्या तहसील कार्यालय येथे उपलब्ध असतात एक जून पासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्याने तुळजापूर तहसील कार्यालयाचे कामकाज निम्म्या कर्मचाऱ्यावर चालू आहे.

तुळजापूर येथील तहसीलदार यांची नुकतीच बदली झाली आहे त्यांचा पदभार नायबतहसीलदार हे पाहत आहेत तुळजापूर तहसील कार्यालयात एकूण पाच नायब तहसीलदार आहेत या पैकी दोनच नायब तहसीलदार जागेवर आहे. शिंदे यांच्याकडे तहसीलदार पदाचा कारभार दिला आहे. त्यामुळे ते दोन पदभार घेत काम पाहत आहेत तसेच पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार पाटील यांच्याकडे मंदिर व्यवस्थापक व महसूल विभाग असे दोन अतिरिक्त पदभार दिले आहेत. म्हणजे एक तहसीलदार पाच नायब तहसीलदार इत्यादी पदे असून केवळ तीन व्यक्तीवर तहसीलदार कार्यालयाचा कामकाज चालू आहे. तसेच तहसील कार्यालयात लिपिक अव्वल कारकून कारकून असे 30 पद कार्यरत असून त्यापैकी 17 जण रुजू आहेत येथे ही 13 पदे रिक्त आहेत.

तुळजापूर तहसील कार्यालयाचा कारभार निम्म्या कर्मचाऱ्यावर चालू आहे यामुळे विध्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी लागणारी विविध कागदपत्रे, शेतकऱ्यांना पिक कर्ज काढण्यासाठी व फेरफार नोंद करण्यासाठी तसेच नागरिकांना विविध कामकाजासाठी तहसील कार्यालय मध्ये पायपीट करावी लागत आहे.

नगरपरिषदचा कारभारही प्रभारीवरच

तुळजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची काही दिवसापुर्वी बदली झालेली आहे. मात्र त्यांच्या जागी नुतन मुख्याधिकारी अद्याप रुजु झालेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी नगर परिषदेचा कारभार हा प्रभारीच पाहत आहेत. त्यामुळे तुळजापूरसाठी तत्काळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top