विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या सोबत : गोकुळ शिंदे शहराच्या विकासाकामासाठी निधीची मागणी करू

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी अजित पवार गटात गटाला समर्थन देण्यात आले आहे याबाबतचे अधिकृत माहिती पत्रकार परिषद घेऊन दिनांक 11 जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे प्रसारमाध्यमाला देण्यात आली. यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसारमाध्यमाशी बोलताना शिंदे यांनी सांगितले की तुळजापूरच्या विकासाच्या दृष्टीने तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला समर्थन करत असून तालुक्यातील 80 टक्के राष्ट्रवादी सदस्य आणि पदाधिकारी आमच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला. तीर्थक्षेत्र तुळजापूर हे केंद्रीय पर्यटन नकाशावर येण्यासाठी तुळजापूर विकासासाठी आम्ही अजितदादा यांना भरघोस निधी मागून तुळजापूरचा कायापालट करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार हे निश्चितच सहकार्य करतील. नळदुर्ग, जळकोट, नंदगाव या भागातील लोकांना शासकीय कामासाठी तुळजापूरला यावे लागते नळदुर्ग तालुका झाल्यास येथील सर्व लोकांची सोय होईल त्यासाठी नळदुर्ग तालुका होण्याचे आमची अजित दादाकडे मागणी राहील बेरोजगारीला आळा घालण्यासाठी तुळजापूर तालुक्यात एमआयडीसीची पूर्वीही मागणी केली होती तीच मागणी अजितदादा मार्फत नक्कीच पूर्ण होईल. म्हाडाच्यावतीने तुळजापूर शहरात जास्तीत जास्त घरे मिळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. विकासासाठीच नामदार अजित दादा पवार यांच्या पाठीशी भक्कमपणाने उभा राहण्याचा निर्धार सर्वांनी केला.

या प्रसंगी शफी भाई शेख माजी नगरअध्यक्ष नळदुर्ग, विजयकुमार सरडे माजी जि.प. सदस्य, दिगंबर खराडे पं.स. मा. सभापती, फेरोज पठाण अल्पसंख्याक राष्ट्रवादी विभाग , महेश चोपदार माजी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक, नितीन आबा रोचकरी राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष, मनोज माडजे तालुका उपअध्यक्ष तथा सदस्य ग्रामपंचायत, सुभाष कदम माजी नगरसेवक, अभय माने शहर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अनमोल शिंदे राष्ट्रवादी युवक उपअध्यक्ष, वैभव शिंदे राष्ट्रवादी युवक कार्यअध्यक्ष, विकी घुगे राष्ट्रवादी ओबीस तालुका अध्यक्ष, अनिलपारवे, सुग्रीव गोडसे, भास्कर इंगोले, भगवान क्षिरसागर, नागेश कोल्हे, विकास डांगे, कदम जाबवंत, दिलीप नवगिरे, अरुण म्हेत्रे, समाधान रोकडे, भागवत नेपते, आबाजी शिंदे, बालन शेख, भैरु लंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top