"संतापाची सही" करीत नागरिकांनी सरकारबद्दल व्यक्त केला राग

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झाला आहे सत्तेसाठी वाट्टेल त्या गोष्टी करत नीतिमूल्ये, तत्व, विचार बाजूला ठेवून भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या इतर पक्षातल्या लोकांना सोबत घेऊन मंत्री केले जात आहे. या सर्व राजकीय घडामोडीमुळे सामान्य जनतेच्या मनात जो राग निर्माण झाला आहे, तो व्यक्त होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र भर 'एक सही संतापाची'  ही मोहीम आयोजित करण्यात आली. तुळजापूर शहरात सुद्धा याचे नियोजन करण्यात आले होते.

सध्याचा राजकीय घडामोडीमुळे सामान्य जनतेच्या मनात जो राग निर्माण झाला आहे ते संतापाच्या सहितुन तुळजापूर शहरवासीयांनी रोष व्यक्त केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांनी सध्याच्या परिस्थिती बाबत संताप व्यक्त केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सरचिटणीस गणेश पाटील, तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष आकाश पवार, शहर उपाध्यक्ष वेद कुमार पेंदे, तुळजापूर शहर उपाध्यक्ष अविनाश राजेंद्र पवार, विध्यार्थी सेना शहराध्यक्ष ऋषी माने, विभाग अध्यक्ष मनोज सोनवणे, सागर जगताप, व मनसैनिक यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top