'स्वराज्य' च्यावतीने खड्ड्यांविरोधात आंदोलन ; बोंब मारत खड्यात बेशरमाचे झाडे लावली

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील सोलापूर लातूर हायवे वरील काक्रंबा येथे एक महिना अगोदरच नवीन झालेल्या रस्त्याला एक महिन्याच्या आत मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे स्वराज्य संघटनेने या अर्ध नग्न होत खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाड लावून खड्डेभोवती रांगोळी काढून खड्ड्याचे पूजन व बोंबा मारत राज्यसरकारचे श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम स्वराज्य संघटना उस्मानाबाद च्या वतीने करण्यात आले .

स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्या सूचनेवरून स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यभरात १०० पेक्षा जास्त ठिकाणी खड्डे बुजवा अपघात वाचवा आंदोलने करण्यात आली. काक्रंबा गावाजवळील लातूर रोड येथे हे आंदोलन करण्यात आले. सामान्य जनतेच्या करातून कोट्यावधी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात आली परंतु ही अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली असून विविध ठिकाणी खड्ड्यांचा भरमसाठ साठा दिसून येत आहे. याचा विपरीत परिणाम सामान्य माणसांवर होत असून दैनंदिन जीवनात वाहतूक करताना समस्यांना तोंड द्यावी लागत आहे. यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण देखील वाढत आहे किंबहुना सामान्य माणसाला जीव गमवावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वराज्य खड्डे बुजवा अपघात वाचवा आंदोलन संघटनेच्या वतीने स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर आंदोलने होत आहेत. यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत खड्डयात बेशरमाची झाडे लावून आंदोलन केले. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन खड्डयांची दुरुस्ती करावी नसता प्रशासनास स्वराज्य संघटना वेठीस धरून निषेध केला जाईल व पुढील आंदोलने हे अतिशय तीव्र पद्धतीने करणार आणि यास संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलना दरम्यान सांगितले.

यावेळी यावेळी स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, स्वराज्य संघटना मराठवाडा प्रवक्ते जीवनराजे इंगळे, राज्य कार्यकारणी सदस्य आबासाहेब कापसे, सत्यजित साठे, कुमार टोले, ज्ञानेश्वर घोगरे, सारंग कानडे, प्रभाकर देवगुंडे, ओंकार कुलाल, प्रथमेश जंगमे, ज्ञानेश्वर सगर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top