तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक महाराष्ट्र राज्य प्रदेशअध्यक्ष सुरज चव्हाण हे रविवार दि. 30 रोजी तुळजापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुरेश बापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे,नूतन जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी त्यांचे स्वागत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते महेश चोपदार, तीर्थ बु चे ग्रामपंचायत सदस्य मनोज माडजे, युवक अध्यक्ष नितीन रोचकरी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विकी घुगे, युवक उपाध्यक्ष समाधान ढाले, माजी नगरसेवक सुभाष कदम, अभय माने, मच्छिंद्र क्षीरसागर, विनोद जाधव सह शहर व तालुका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
