शिराढोण प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील शिराढोण येथील के एन मराठी व उर्दू हाय स्कूल येथे नवनिर्वाचित मुख्याध्यापक या पदावर स्वामी शिवकुमार प्रभू यांची पद उन्नती करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील शिक्षक व गावाकर्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार करताना मा जि प सदस्य शहाजी पाटील,प्रशासकीय अधिकारी शेख एम एम, उपसरपंच अमोल माकोडे, ग्रा प सदस्य ऍड नितीन यादव, आकाश धाकतोडे, अमोल नाईकवाडे, अवधूत पाटील, निलेश नाईकवाडे, साबेर पठाण व शिक्षकराजेश्वर पाटील, चंद्रकांत महाजन,युसूफ शेख, अकबर शेख, मेंडके,शेख समीर, मुलाणी,शेख आर येम, खमर, मतीन, ढगे आदी उपस्थित होते.
