तुळजापूर प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी मंगळवार दि. 29 रोजी तुळजापुर शहरात आले असता तुळजापूर खुर्द येथे नारायण ( भाऊ ) नन्नवरे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी नन्नवरे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चालूक्य यांचा हार, पेढा भरवून श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. पक्ष बांधणी, सह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, गुलचंद व्यवहारे, विकास मलबा, अजिंक्य नन्नवरे सह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
