तुळजापुर प्रतिनिधी
खडकाळ गल्ली येथील रणसम्राट कबड्डी संघाच्यावतीने अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेशवरी पारायण भागवत कथेचे आयोजन दिनांक 22 ते 29 ऑगस्ट 2023 या दरम्यान करण्यात आले होते.
या सप्ताची समारोप मंगळवारी कालयाचे किर्तन ह.भ.प.अर्जुन महाराज लाड गुरूजी यांच्या किर्तनाने भक्तिमय वातावरणात झाला. यावेळी माजीमंत्री मधुकरराव चव्हाण व विजय खळदकर उपस्थित होते. कालयाचा महाप्रसाद नगरसेवक सुनिल( पिंटू) रोचकरी यांनी केला. महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. यासाठी रणसम्राट कबड्डी संघाच्या सभासदांनी परिश्रम घेतले.
