अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची महिला कार्यकारणी जाहीर

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची गुरुवार दि. 4 रोजी दुर्गा नंदी शिवशक्ती अपारमेंट रावळ गल्ली येथे प्रदेश कार्याध्यक्ष धैर्यशील कापसे, महिला कार्यअध्यक्षा मीनाताई सोमाजी, जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली. यावेळी बैठकीत नूतन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या.

यामध्ये  महिला तालुका उपाध्यक्षपदी माधुरी विजयकुमार पाटील, तालुका कार्याध्यक्ष वर्षा बालाजी चव्हाण  तुळजापूर शहराध्यक्ष सायली गणेश पाटील, जिल्हा सरचिटणीस सविता ऋषिकेश भोसले, सारिका जितेंद्र छत्रे, शहर सरचिटणीस योगिता सचिन थिटे तर जिल्हा सहसचिवपदी सुलताना शौकत शेख यांची निवड करण्यात ली प्रसंगी नूतन निवडी बद्दल सर्वांचे अभिनंदन करून संघटनेची उद्दिष्टे ध्येय धोरणे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणारी विविध कार्याची माहिती महिला पदाधिकारी यांना देण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलनाचे संघर्ष समितीचे शहर अध्यक्ष निखिल अमृतराव, जिल्हा उपाध्यक्षा उषा धाकतोडे तालुका अध्यक्ष लता हरवाळकर, अरूणा कावरे, सुनिता काळे, अक्षता राऊत ईत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top