काक्रंबा येथे उद्या सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

स्वराज्य प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या संकल्पनेतून प्रामुख्याने शेतकरी ,कामगार ,सहकार ,शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करण्यासाठी स्वराज्य संघटनेची स्थापना करीत त्यांनी राज्यात संघटना वाढवली बुधवार दि. 9 रोजी स्वराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त काक्रंबा येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार व भव्य रक्तादान शिबीर, वृक्षारोपण व अनाथ विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वराज्य निमंत्रक सत्यजित साठे यांनी दिली.

गावातील ग्रामपंचायत शेजारील मारूती मंदिर, येथे सदरील शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ८ ते सायं. ४ पर्यंत तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून शिबिराचे लाभ घेण्यासाठी पुर्व नांव नोंदणी करणे आवश्यक असून नांव नोंदणीसाठी गणेश जगताप 9689748526 अथवा प्रथमेश जंगमे 9421984902 यांच्याशी संपर्क साधून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे ही आव्हान करण्यात आले आहे.






Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top