तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे सोमवार दि. 28 रोजी तुळजापूर येथे श्री. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले असता त्यांचा जिल्हा व शहर भाजपाच्या स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, जिल्हा चिटणीस प्रभाकर मुळे, विकास कुलकर्णी, गुलचंद व्यवहारे, तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, शहर अध्यक्ष शांताराम पेंदे, विकास मलबा, भारतीय जनता पार्टीचे नेते तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, शहर अध्यक्ष राजेश्वर कदम, शहर कार्याध्यक्ष राम चोपदार, युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल, सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.
