तुळजपूर प्रतिनिधी
तुळजापूर तालुका विधिज्ञ मंडळाची अध्यक्ष ऍड . संजय एच. पवार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि 4 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत जालना येथे मराठा आरक्षण संदर्भात चालू असलेल्या शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकावरती अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या पोलिस प्रशासनाचा तुळजापूर तालुका विधिज्ञ मंडळाच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला. तर एक दिवस कोर्ट कामकाजामध्ये सहभागी न होण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
