तुळजापूर प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हाअल्पसंख्याक (उबाटा )सेनेचे जिल्हाअध्यक्ष तथा खा ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले आमीर इब्राहीम शेख यांनी आपला पदाचा राजीनामा सादर केल्याने तुळजापूर तालुका शिवसेनेत खळबळ उडाली
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना दोन ओळीचे पञ देवुन राजीनामा सादर केला आहे. आपल्या राजीनाम्यात शेख यांनी म्हटलं आहे की मी माझ्या वैयक्तीक कारणास्तव माझ्या पदाचा राजीनामा दिला असल्याची प्रतिक्रिया दिली.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमीर शेख यांनी आपल्या कार्यकौशल्याने जिल्हयातील अल्पसंख्याक समाज सह इतर समाज शिवसेनाउबाठा कडे जोडला होता शिवसेनेच्या संकट काळात ही ते ठामपणे उध्दव ठाकरे यांच्या मागे उभे टाकले होते त्यांच्या जाण्याने शिवसेनेला आगामी निवडणुकांन मध्ये फटका बसण्याची शक्यता आहे.
