तुळजापूर प्रतिनिधी
अभिषेक पासचा दर पूर्वत करावे व मंदीर परीसरातील दक्षिण बाजुस टोळ भैरोबा दरवाजा बर्याच वर्षा पासुन बंद आहे तो उघडण्यात यावा तसेच नगर परिषद शाळेच्या विकास कामाकरिता श्री तुळजा भवानी मंदीर संस्थान मार्फत ६ कोटी निधी उपलब्ध करुन देणे बाबत रविवार दि. 10 रोजी मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी जिल्हाधिकारी डॉ. ओंम्बासे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजा भवानी मंदीर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत व साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ आहे येथे सर्व साधारण एका दिवसात 40 ते 50 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात तर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार तसेच नवरात्र काळात भाविकांची संख्या हि लाखां वरती अस्ते या शहरास ऐतिहासिक महत्व आहे. देशाच्या कानोकोपर्यातुन भाविक दर्शनासाठी येत असतात.
तुळजा भवानी मंदीर विश्वस्त बैठकी च्या इतिवृत्तानुसार अभिषेक पास दरात रु 500 वाढविण्याचा ठराव पारीत केला आहे. परंतु भाविक, पुजारी यांचे हित लक्षात घेता अभिषेक पास दरात रु 500 च्या ऐवजी पूर्वीचा रु 50 दर ठेवण्यात यावा. तसेच टोळ भैरोबा दरवाजा हा सुरक्षेच्या कारणास्तव बरेच वर्षा पासुन बंद आहे तो दरवाजा स्थानिक पुजारी, भाविकांसाठी उघडण्यात यावा. त्यामुळे भाविक भक्तांना व वृद्ध व्यक्तींना व पुजारी बांधवांना मंदीरात जाण्यासाठी सोयीचे होईल. व सद्य परस्थिला नगर परिषद अंतर्गत शाळा तिन असुन काही शाळा ISO मानांकन प्राप्त आहेत सदरील शाळेच्या इमारती या पडीक, अपुरी जागा अशा अवस्थे मध्ये आहेत. सदरील शाळेच्या विकास कामासाठी तुळजा भवानी मंदीर संस्थान मार्फत नव्याने शाळेच्या विकास कामासाठी ६ कोटी निधी मंदीर संस्थान मार्फत देण्यात यावा. जेणे करुण शहरातील नगर परिषद शाळांचाही विकास होईल व शहर वासियांच्या दृष्टीकोणातुन एक चांगल्या प्रकारच्या शाळेची उभारणी होईल असे नमूद केले आहे. यावेळी माजी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे उपस्थित होते.