आधुनिक सावित्रींनी धैर्यवान होऊन ध्येय साध्य करावे - रोहिणी जाधव

mhcitynews
0

 


तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे स्त्री शिक्षणाची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर प्रोफेसर डॉ. यशवंतराव डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सदर प्रसंगी रोहिणी जाधव, पोलिस उपनिरीक्षक, पिंक पथक, तुळजापूर यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना वरील प्रतिपादन केले. महिला सक्षमीकरण विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलताना म्हणाल्या की, आधुनिक काळ हा स्पर्धेचा काळ आहे,या काळात मुलांनी मुलींचे संरक्षण करणे गरजेचे आहे. जर मुलींना सतत कोणता त्रास होत असेल तर तो वेळीच पिंक पथक यांना संपर्क करुन सांगावा जेणेकरून संबंधित व्यक्तीला कायदेशीर कारवाई करण्यास उशीर होणार नाही. मुलींनी व्यक्तिगत माहिती सोशल मीडियावर टाकून व्यक्तिगत जीवन सार्वजनिक करु नये कारण या माहितीचा दूरुपयोग होऊ शकतो. मुलींनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःचे ध्येय गाठून समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे काळाची गरज आहे . खरा पुरुषार्थ स्त्रियांचा आदर करण्यात आहे असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला. सदर प्रसंगी महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ. सी. आर. दापके, प्रा.एस. एम कदम, तसेच प्रा धनंजय लोंढे , प्रा. डॉ. मंत्री.आर. आडे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top