तुळजापूर प्रतिनिधी
सोलापूर तुळजापूर रेल्वेच्या कामासाठी रेल्वे विभागाने संपादित करत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीस योग्य मोबदला देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूरच्या वतीने राष्ट्रपती महोदया यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सोमवार दि. 29 रोजी निवेदन देण्यात आले.
केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाच्या वतीने सोलापूर ते तुळजापूर रेल्वे कामासाठी तुळजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ला देण्यात येणारा मावेचा हा अत्यंत कमी व अल्प आहे. रेल्वे विभाग शेतकऱ्यांच्या जमिनी या कवडी मोल भावात घेत असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे राष्ट्रपती महोदया आपण यात लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळवून देण्यास संबंधित विभागास निर्देशित करावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, अनिल शिंदे, दिलीप मगर, विधानसभा उपाध्यक्ष रुबाब पठाण, शहाजी नन्नवरे, तुळजापुर शहराध्यक्ष अमर चोपदार, उपाध्यक्ष मकसूद शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे, आय.टी सेल जिल्हा अध्यक्ष अमोल पाटील, युवक तालुका प्रभारी अध्यक्ष शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, आकाश शिंदे, वाहेद शेख, शहाजी कसबे व शेतकरी बांधव मोठ्या उपस्थित होते.
