जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,तोचि साधू ओळखावा,देव तिथेच जाणावा.
असे जगतगुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून गरिबांची सेवा करा दुःखितांचे अश्रू पुसण्याचा संदेश यातून दिला आहे. मात्र आजच्या जीवनपद्धतीमुळे जो तो आपल्याच धुंदीत व्यस्त आहे त्यामुळे इतरांच्या सुखदुःखापेक्षा स्वतःच्या ऐहिक सुखाला महत्त्व देत असल्याचे दिसते यामुळे कोणालाच कोणासाठी वेळ नसल्याची दिसून येते मात्र अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते गोरगरिबांचे प्रश्न त्यांच्या अडीअडचणीची सोडवणूक करून त्यांची ही जीवन कसे सुखकर होईल याचा विचार केला जातो त्यावर चर्चांची गुऱ्हाळ पेटले जाते मात्र प्रत्यक्ष कृती करण्यासाठी कोण पुढे येईल असा प्रश्न उपस्थित झाल्यास जो तो मागे असल्याचे चित्र समाजात दिसते.
गरिबी दूर करणे समाजमनात बदल घडविणे शक्य नसले तरी त्यात थोडे बहुत परिवर्तन होऊ शकते याच विचाराने समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो या उद्दात हेतूने प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आमदार बच्चू कडू यांचे कट्टर समर्थक असलेले जुबेर भाई शेख हे कष्टकरी वंचित उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शून्य टक्के राजकारण शंभर टक्के समाजकारण ध्येय बाळगत दिव्यांग बांधवां ची होणारी हेळसांड धावपळीच्या जगात त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात तालुका जिल्हा स्तरापासून ते थेट मंत्रालय गाठत प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून तुळजापूर तालुक्यात दिव्यांगांसाठी, सामाजिक उपक्रम घेणे, शेतकऱ्यांच्या दुष्काळातील समस्या शासनात दरबारी मांडणे, वृक्षारोपण करणे, कोरोना महामारीत वृत्तांकन करणाऱ्या पत्रकार बांधवांना अपघाती विमा योजना लागू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे, कोरोना काळात विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करणेबाबत चे प्रश्न, जागोजागी रस्त्यावर भले मोठे पडलेल्या खड्ड्यांचे पक्षाच्या माध्यमातून स्व :खर्चातून रस्ते दुरुस्ती करणे, सेतू सुविधा केंद्र द्वारे सामान्याची होणारी हेळसांड बाबत आवाज पाठविणे, आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात एकूण पाच हजार एक रोपांचे वाटप करून त्याचे संगोपन करण्याचे काम असे एक नाही तर अनेक समाजाभिमुख कार्यक्रम घेत आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे व आता विर महाराष्ट्र न्यूज चॅनेल च्या माध्यमातून आपला ठसा उमठविणारे आमचे स्नेही बंधू संपादक जुबेर भाई शेख यांना त्यांच्या सामाजिक कार्यास सलाम तसेच जन्मदिनानिमित्त आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्यांचे नेतृत्व करण्यासाठी भावी नगरसेवक म्हणून ते विराजमान व्हावेत यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगलमय कामना आणि पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या जुबेर भाई यांना कोटी कोटी शुभेच्छा..
संपादक....
