तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तथा वफ्फ बोर्ड चेअरमन डॉ. वजाहात मिर्झा ( Dr. vajahat Mirza) हे बुधवार दि. 7 रोजी नियोजित दौऱ्या दरम्यान तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे संध्याकाळी धावती भेट घेत अल्पसंख्यांक समाजातील अडीअडचणी जाणून घेतल्या व त्याचे निराकरण करू असे आश्वासित केले.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील , काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तोफिक शेख, मा. नगरसेवक रणजित इंगळे, बालाजी बंडगर, ऍड रामचंद्र ढवळे, बागवान समाजाचे सदर हाजी जावेद बागवान, युसुफ शेख, हज्जूमिया अत्तार, आरिफ बागवान , फिरोज पठाण, लालासाहेब तांबोळी सह अल्पसंख्यांक समाजातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
