Haldi Kunku | कदम सोंजी परिवाराच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

mhcitynews
0

तुळजापुर प्रतिनिधी 

स्त्री शक्तीचे प्रतीक असलेले कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा पुण्यपावन नगरीत संक्रांतीच्या सणाचे व रथसप्तमी मध्य साधत दि. १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस साजरा केला जातो या रोजी सकी मैत्रीणला एकत्र करत येथील वेताळ नगर भागातील सौ.भाग्यश्री प्रशांत कदम सोंजी, जयश्री कदम सोंजी, प्रभावती कदम सोंजी परिवाराच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


प्रसंगी कार्यक्रमात नारी शक्तीचे प्रतीक असलेले आई श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रतिमेला फुलांनी व रांगोळीनी सुवासिनी साज संक्रांतीच्या वाणाची आरास मांडण्यात आली होती.


आलेल्या महिलांना अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील शेकडो महिलांनी हळदीकुंकवाचा कार्यक्रमात यावेळी उपस्थित होत्या. गेल्या १४ वर्षापासून हा उपक्रम घेत महिलांचा मान सन्मान कदम सोंजी परिवाराच्यावतीने करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top