जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाराशिव-उस्मानाबाद जिल्हा दौरा होणार असून या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव-उस्मानाबाद येथे शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता महत्वाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी प्रदेश पदाधिकारी, प्रमुख नेते, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व फ्रंटल अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, विद्यार्थी तसेच सर्व फ्रंटल सेल / विभागाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, व अजित दादा राष्ट्रवादी प्रेमी यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांनी केले आहे.
