तुळजापूर प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती अतिशय खालावली आहे. मात्र शासन त्यांच्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देत नाही. ही बाब गंभीर असून त्यांच्या समर्थनार्थ तुळजापूर येथील तेजस सतीश बोबडे यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरु केले आहे.
आज शुक्रवार दि. 16 रोजी श्री तुळजाभवानी बिल्डिंग मटेरियल सप्लायर व्यापारी संघटनेच्या वतीने भेट देत त्यांना पाठिंबा दिला सरकार ने लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घेऊन, मराठा समाज ला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे असे यावेळी व्यापारी संघटनेच्या वतीने सरकारला मागणी केली. यावेळी मटेरियल सप्लायर्स व दुकानदार उपस्थित होते.
