तुळजापुर प्रतिनिधी
येथील क्षत्रियकुलावतंस (मावळा) प्रतिष्ठाण मंडळ अध्यक्षपदी श्रीकांत (बप्पा) कांबळे यांची निवड करण्यात आली तर उर्वरीत कार्यकरणीत उपाध्यक्षपदी समर्थ कवडे कोषाध्यक्ष गणेश स्वामी मिरवणुक प्रमुख सुरज दिक्षीत, सचिव गणेश दरेकर, सहसचिव श्रवण कांबळे आदींची निवड करण्यात आली. प्रतिवर्षी प्रमाणे विविध समाजोपयोगी उपक्रम घेत शिवजयंती साजरी करणार असल्याचे संस्थापक नागेश तावसकर म्हणाले. यावेळी युवराज तावसकर, नागेश तावसकर, लहु कांबळे, किशोर दरेकर आदीनी नुतन पदाधिकारी यांचा सत्कार केला.
