तुळजाभवानी महाविद्यालयात आजपासून शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमाला

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.११/३/२४ ते १३/३/२४ या कालावधीत तीन दिवसीय शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.


सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन तुळजापूर येथील नगर परिषदेच्या पहिल्या महिला मुख्याधिकारी, भा.प्र.से‌. प्रियंवदा म्हाडदाळकर यांच्या हस्ते संपन्न होणार असून पहिले पुष्प डॉ.शिवाजीराव देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक, सोलापूर हे गुंफनार आहेत. उद्घाटनप्रसंगी सज्जनराव साळुंके, सदस्य, महाविद्यालय विकास समिती, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे असणार आहेत. दि.१२ मार्च २४ रोजी द्वितीय पुष्प प्रा.ए.डी.जाधव , ज्येष्ठ अभ्यासक, सोलापूर हे गुंफनार असून यावेळी सिनेट सदस्य डॉ. अंकुश कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, तर अध्यक्ष डॉ. कायला कृष्णमूर्ती, प्राचार्य, शिक्षणमहर्षी डॉ‌. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय, धाराशिव हे असणार आहेत.


व्याख्यानमालेचा समारोप समारंभ दि.१३/३/२४ रोजी संपन्न होईल, याप्रसंगी समारोप प्रमुख म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सी.ई.ओ.मा. श्री कौस्तुभ गावडे असणार आहेत तर तिसरे पुष्प डॉ. मच्छिंद्र नागरे, ज्येष्ठ साहित्यिक श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम हे गुंफनार आहेत. तर यावेळी सिनेट सदस्य मा. श्री देविदास पाठक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर डॉ.प्रशांत दिक्षित, प्र. संचालक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिव हे अध्यक्षीय स्थान भूषवतील. सदर व्याख्यानमाला ही विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी खूप मार्गदर्शक ठरेल. कारण अज्ञानाच्या अंधकारमय समाजात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी ज्ञानाची ज्योत संस्कारासोबत तेवत ठेवली. त्यावेळी त्यांनी कसा संघर्ष केला. उच्च शिक्षण क्षेत्रात मराठवाड्यामध्ये जर शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी आपले पाऊल त्यावेळी टाकले नसते तर काय परिणाम झाले असते,या सर्व बाबींचा विचार आज समाजानेही करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच या व्याख्यानमालेचे आयोजन मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि आई तुळजाभवानी मातेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य मेजर प्रोफे. डॉ. यशवंतराव डोके यांनी दिली. तसेच सर्व तुळजापूर वासियांना,आजी माजी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित रहाण्याचे आवाहन डॉ. डोके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top