तुळजापूर येथील मेळाव्याला श्री तुळजाभवानीची मातेचा आशीर्वाद - बसवराज पाटील

mhcitynews
0

तुळजापूर 

येथील श्रीनाथ लॉन्स येथे वीरशैव इंटरनँशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने दि.१० रविवार रोजी जागतिक महिला दिनाच्या अवचित साधून महिला उद्योग मिळायचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री बसवराज पाटील लेडीज क्लबचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील संयोजक सुवासिनी कोयटे कळंबच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णाताई मुंडे, परळीच्या नगराध्यक्षा सरोजनीताई हलगे,वाशीच्या माजी नगराध्यक्षा प्रतीभा शिंगणापूरे,उमरगा माजी नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे,मंगळवेढा माजी नगराध्यक्षा अरुणाताई माळी, सरलाताई पाटील, राजाभाऊ मुंडे गुरुनाथ बडूरे श्रीकांत साखरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


यावेळी व्यासपीठावर अर्चनाताई खडके,सुशिलाताई आंधळकर, मीना सोमाजी,सह राज्यातील हजारो महीला या उद्योग मेळाव्याला उपस्थित होत्या.पढे बोलताना बसवराज पाटील म्हणाले की नारी शक्ती ही काळाची गरज आहे. महीलानां वंचित ठेऊन आपण , देशाची प्रगती करु शकत नाही. अनेक प्रगत राष्ट्रामधे महीलांच योगदान मोठ आहे. आमच्या भागात अशा महीला मेळाव्याची फार गरज आहे. या महीला उद्योग मेळाव्याचा जिल्ह्याला फायदा होणार आहे असे त्यांनी सांगितले काकासाहेब कोयटे म्हणाले की महिला दिन सप्ताहात आम्ही हा महीला उद्योग मेळाव्याचे आयोजन करत आहोत.महीलानां घरगुती व्यवसाय करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ बनवणा-या मशीनरी, चकली, कुरडया, पापड बनवणा-या मशीनरी, अगरबत्ती कापुर बनवणाऱ्या मशीनरी, पँकींग,बायडींग मशीनरी, मार्केटिंग व कर्ज देणा-या पतसंस्थे व्दारे कर्ज उपलब्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात कार्यक्रमाचें आयोजक गुरूनाथ बडुरे ,राजाभाऊ मुंडे,या वेळी महीला उद्योजक कार्यशाळा संपन्न झाली. महाराष्ट्रातील यशस्वी उद्योजक महीलाच्यां मुलाखती झाल्या.या कार्यक्रमाचे नियोजन अँड.अंजलीताई साबळे,अस्मिता शेटे,अनुराधा तोडकरी,राजश्री माळगे,सारीकाताई बडुरे, रेखा कोरे शुभांगी करीशेट्टी,संजीवनी तोडकरी,शिवकांता साखरे,वैशाली बडुरे, अमृता बचाटे, विजया शेटे,ज्योती बचाटे, रचना मस्के, रवी उळेकर रेश्मा कोप्पा सविता अष्टके राजश्री धरणे,रंजना मेनकुदळे, इंदुमती तोडकरी, संदीप यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेक कोरे यांनी केले आभार अस्मिता शेटे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top