तुळजापूर प्रतिनिधी
दुष्काळामुळे अनेक शहरात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पण टँकर कधी येईल याचा नेम नाही. आले तरी फारतर ड्रमभरच पाणी मिळते. हाताला काम नसल्याने पाणी विकत घेणे परवडत नाही. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावागावात जलदूत अवतरले आहेत. माणुसकीचा दुष्काळ टाळत त्यांनी स्वत:च्या मालकीच्या बोअर आणि विहिरीतील पाणी ग्रामस्थांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. काही गावात तर ही मंडळी सर्व कामे सोडून दिवसभर पाणी वाटप करताना दिसत आहेत.
तुळजापूर येथील रामचंद्र रोचकरी व निलेश रोचकरी या जलदुतांनी गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे सध्या सर्वत्र भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे ही समस्या आपल्या प्रभागात झोपडपट्टी व इतर वस्त्यावर याची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे लक्षात घेऊन स्वखर्चाने दोन टॅंकरने नळदुर्ग रोड एसटी कॉलनी झोपडपट्टी भागात पाणी वाटप सुरू केले असून याचे उद्घाटन विनोद गंगणे, विशाल रोचकरी, पंडित जगदाळे, अमर हंगरगेकर, विजय कंदले, महेश गवळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना रामचंद्र रोचकरी यांनी सांगितले की हा मोफत उपक्रम 15 जून पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे सातत्याने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
