तुळजापूर प्रतिनिधी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथील एच.एस.सी.व्होकेशनल विभागातील प्राध्यापिका श्रीमती सविता मिलींदराज कदम यांच्या २५ वर्ष सेवेनंतर ज्ञानदानाच्या पवित्र कार्यानंतर सेवानिवृत्त झाल्या यासाठीच त्यांचा सेवागौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ अशोकराव जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,शिक्षकांमुळे विद्यार्थी जरी तयार होत असले तरी विद्यार्थ्यांमुळे देखील शिक्षकांना शहाणपण येत असते.महाविद्यालयीन विद्यार्थी हे वेगळ्या मानसिक अवस्थेत महाविद्यालयात प्रवेश घेत असतात.अशा प्रसंगी चांगल्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी व तयारीच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी मानसिक तयारी शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे.रामकृष्ण परमहंस महाविद्यालय ते तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर मधील श्रीमती कदम यांचा प्रवास या दोन्ही मानसिक अवस्थेतून व्यवस्थितपणे संपन्न झाला.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख म्हणाले की शिक्षकांचे कार्य शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या विचारांवर चालणे गरजेचे आहे .संस्थेतील विद्यार्थी हे महाविद्यालयात शिक्षण घेऊन आजतागायत कलेक्टर पदापर्यंत गेले नव्हे तर डॉ दयानंद शिंदे सारखे विद्यार्थी तर कुलगुरू पदापर्यंत गेले.शिक्षक हे अध्यापन कार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आत्मपरिवर्तन घडवून चारित्र्यवान विद्यार्थी घडवत असतात.यावेळी अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ प्रोफेसर यशवंतराव डोके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सदर प्रसंगी श्रीमती कदम यांच्या शैक्षणिक कार्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व महाविद्यालयाच्या वतिने प्रमाणपत्र व सन्मानपत्र पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा जे.बी क्षीरसागर यांनी केले तर ज्युनिअर विभागाच्या वतीने प्रा धनंजय लोंढे यांच्यातर्फे श्रीमती कदम यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमामध्ये प्रा डॉ.सी.आर दापके,प्रा.व्ही.एच चव्हाण ,कल्याणी कदम ,कृपा घाडगे ,प्रा.मगरे माधुरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सत्कारमूर्ती प्रा.सविता कदम यांनी आपल्या मनोगतातुन संस्थेविषयी व महाविद्यालया विषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा धनंजय लोंढे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.नेताजी काळे यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी , तसेच श्रीराज कदम यांच्यासह परीवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
