हटके आंदोलन.. भ्रष्ट अधिकाऱ्याला साडी बांगड्या चोळी चा आहेर देणार !

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हा धाराशिव यांच्यावतीने बुधवार दि 26 रोजी सकाळी 11.30 श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या कार्यालयासमोर भ्रष्ट अधिकाऱ्याला साडी बांगड्या चोळी चा आहेर देऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे.


मागील एक वर्षापासून तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याशी व्हीआयपी नसताना व्हीआयपी असल्याचा भासून बनावट व्हीआयपी माणसे मंदिराच्या पास वाटप चालू असल्याने यावर ती चौकशी करून कारवाई करण्याबाबत पत्रव्यवहार चालू 

आहेत तरी तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी दिनांक 18/6/2023 रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांना एक पत्र दिले की व्हीआयपी गेटचे सीसीटीव्ही व रजिस्टर चेक करून कारवाई करण्यात येईल अशा स्वरूपाचे पत्र देऊन सुद्धा दहा ते अकरा महिने उलटून जाऊन सुद्धा तुळजाभवानी मंदिर संस्थान यांनी कुठलीही कारवाई केली नसून व त्या संदर्भातले कुठलेही पत्रव्यवहार केले नसून वारंवार मुख्यमंत्री साहेब व मंदिर संस्थांचे अध्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी वारंवार केली असून त्यांचे कोणतेही उत्तर आले नाही यामुळे अधिकाऱ्याचा निषेध म्हणून बुधवार दि. 26 रोजी अधिकाऱ्यांना साडी चोळीचा बांगड्या देऊन तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या कार्यासमोर तीव्र आंदोलन केले जाईल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top