मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही महत्वाकांक्षी योजना लागू करण्यासाठी डोमिसाइल ची अट रद्द करने किंवा पर्यायी व्यवस्था करणे बाबत शिवसेना प्रवक्ते योगेश केदार यांनी राज्याचे एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लागू करून आपण अत्यंत मोठा निर्णय केला आहे, जो लाखो महिलांच्या जीवनात योगदान देईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लावलेली डोमासाईल ची लावलेली अट अतिशय जाचक आहे. हा दाखला काढणे तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्र सुद्धा किचकट आहेत. साधारण गाव खेड्यात काम करणाऱ्या महिलांना त्याची जुळवाजुळव करणे मुश्किल आहे. तसेच ते निघायला साधारण दहा ते पंधरा दिवस जातात.
त्यामुळे रहिवाशी दाखला म्हणून तलाठ्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा रेशन कार्ड ग्राह्य धरावे अशी आग्रही मागणी याद्वारे करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सदर विषयाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचा शब्द दिल्याचे योगेश केदार यांनी यावेळी सांगितले.

