वसंतराव नाईक हे कृषीप्रधान भारताचे कृषीसंत - प्र.प्राचार्या डॉ.दापके

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ छाया रमेश दापके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.सदर प्रसंगी त्यांनी वरील प्रतिपादन केले.


आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्या पुढे म्हणाल्या की, वरिष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शन आणि वसंतराव नाईक यांच्या कृतिशील कारभार यातून देशात महाराष्ट्र राज्य प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले.एक राज्यकर्ता खरा लोकनेता कसा होऊ शकतो याचा परिपाठ त्यांनी घालून दिला.देशात सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.त्यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.यवतमाळ जिल्ह्यातील एका खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले एक व्यक्तीमत्व शेतकऱ्यांविषयी व शेतीविषयक उपजत ज्ञान त्यांना होते.ते एक हाडाचे प्रगतीशील शेतकरी होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अकोला,परभणी,राहुरी येथील कृषी विद्यापीठे तसेच परळी,कोराडी,पारस , खापरखेडा येथील औष्णिक विद्युत केंद्रांची स्थापना अशी उपलब्धी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झाली असे अनमोल मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.


याप्रसंगी प्रा धनंजय लोंढे,प्रा.अनिल नवत्रे यांच्यासह प्रा.नेताजी काळे,प्रा दिपक निकाळजे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार विद्या समिती सदस्य प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा डॉ मंत्री आर आडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top