तुळजापूर प्रतिनिधी
समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच उभे राहतात आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. लौकिक अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित, पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. अशा सेवाव्रतींना " सिटी न्यूज" परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा.
तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या पाठीमागील कुलस्वामिनी हॉसिंग सोसायटीमधील बागेत सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते रामचंद्र (आबा) रोचकरी व निलेश (भैय्या) रोचकरी हे दोन्ही भावंड सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून स्वखर्चाने बसण्यासाठी चार बाकडे व लाईटची व्यवस्था करीत मानुसकीचे दर्शन घडविले. तसेच त्यांनी कॉलनीत फिरुन येथील नागरिकांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या. यावेळी खराब झालेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्याचे व अंधारमय भागात लाईटचे फोकस बल्ब बसविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी नागरिकांना दिले. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सोसायटीच्या वतीने सोसायटीमधील सदस्यांच्या उपस्थितीत श्रीनाथ मंगल कार्यालय ऑफिसमध्ये रामचंद्र व निलेश रोचकरी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार व्यक्त केले.
यावेळी श्रीनाथ मंगल कार्यालयाचे गणेश पुजारी, अनिल आगलावे, उमाजी गायकवाड, राहुल जाधव, कुमार क्षिरसागर, हरिदास (बापू ) नाईकवाडी, लक्ष्मण चौधरी, आबा पुजारी, मोहन शिंदे, सुरज लोंढे आदी नागरिक उपस्थित होते.
