तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम येथे पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम संपन्न

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तीर्थ बुद्रुक येथील वैराग्यधाम येथे शनिवार दि. 7 रोजी श्री सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या समाधीवर रुद्राभिषेक व भजन कीर्तन सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.


यानंतर केदार पिठाचे जगद्गुरु श्री भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभा घेण्यात आली. यावेळी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, उद्योजक अशोक जगदाळे, मेघ पाटील, राजेंद्र मुंडे, गुरुनाथ बडूरे, गोविंदराव माकणे, लक्ष्मण उळेकर, शेषराव वांगसकर, अरविंद बेडगे, राहुल साखरे, अभिषेक कोरे,संजय शिंगाडे आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले की केदार जगद्गुरूंच्या पाठपुरावा असल्याने केदारधाम येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना अनेक सोयी उपलब्ध झाल्याचे सांगितले व या पिठातर्फे नांदेड, तुळजापूर, बेंगलोर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भक्तनिवासामुळे भाविकांची सोय झाली असून उत्तराखंड येथील ऋषिकेश मध्ये भक्त निवास उभारण्याची केदार जगद्गुरूंचे संकल्प आहे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top