तुळजापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकच नारा..अबकी बार धीरज भैय्या आमदार..
तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष धीरज पाटील हे विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यादृष्टीने धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढू म्हणतं आगामी विधानसभेच्या तयारीला लागले आहेत.
2019 ला आपण विधानसभेसाठी आग्रही होतो पक्ष श्रेष्ठींनी त्यावेळी वयाचा दाखला देत जिल्हा परिषद अध्यक्षपदावर संधी दिली व पुढच्या वेळी विचार करू असे सांगितले आमची तिसरी पिढी काँग्रेस मध्ये एकनिष्ठ म्हणून काम करीत असून म्हणून मी उमेदवारी मागत आहे.
प्रदेश अध्यक्ष नाना पटोले सह पक्षश्रेष्ठी यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी जनसंपर्क करण्याचे सांगितले त्यानुसार मि गाव भेट दौरा चालू केला असून गावोगावी जाऊन लोकांच्या भावना जाणून घेत आहे यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सर्वच कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा भेटत असल्याचे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
विद्यमान आमदार नुसते पोकळ आश्वासन देतात बंद साखर कारखाना व दूध संघाकडे न बघता तामलवाडी MIDC चे पोकळ घोषणा करतात असा आरोप ही त्यांनी यावेळी आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर लगावला.
