तुळजापूर प्रतिनिधी
ग्रामव्हिजन मल्टीपर्पज सोशल फाउंडेशन व मॅनकाइन (Mankind) फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आरळी बु. परिसरातील नागरिकांसाठी नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे, सदरील शिबीराची वैशिष्ट्ये म्हणजे तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन, तपासणी व उपचार, गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार, गरजू रुग्णांना अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वोत्परी मदत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तपासणी व उपचार अशी असून, शिबिराचे ठिकाण आरळी बु. तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असून शनिवार दि.२० जुलै २०२४ रोजी वेळ सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० वाजेपर्यंत आहे, सदरील शिबीराचा परिसरातील सर्व गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामव्हिजन मल्टीपर्पज सोशल फाउंडेशन चे महेश (भैय्या) गवळी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
