तुळजापूर प्रतिनिधी
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि एस.एम.एफ.जी गृप यांच्या संयुक्त विद्यमाने महावृक्ष लागवड मोहीम सुरू झाली असून एक स्वयंसेवक तिन वृक्ष अशा पध्दतीने ही मोहीम सुरू असणार आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सदरची मोहीम सुरू झाली असून नैसर्गिक संसाधने आणि त्यांचा वापर, त्याचबरोबर झालेली वृक्षतोड व त्यांच्या दुष्परिणाम या सर्व बाबींचा विचार करून सदर मोहीम सुरू केल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांनी दिली आहे.यावेळी एस.एम एफ जी चे बॅच मॅनेजर परमेश्वर सगर, गणेश गुंड,राजेश कोकल यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा बी जे कुकडे, प्रा.डॉ.मंत्री आर आडे तसेच सर्व स्वयंसेवक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
