तुळजापूर नगर परिषद स्वछता व फवारणी मोहीम कधी राबविणार
तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर शहरात साथीच्या आजाराने पाय पसरवले आहेत. मच्छरांसह जीवजंतू 'ऍक्शन मोडवर' अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्यामुळे सामान्य माणूस डेंग्यू, मलेरियाने फणफणला आहे. तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदारसाहेबांनी याकडे लक्ष देऊन डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्याबाबत तुळजापूर नगरपरिषदेला फैलावर घ्यावे असे नागरिकांतून बोलले जात आहे.
यात प्रामुख्याने व्हायरल फिवरचे (डेंग्यू व इतर) रुग्णासोबतच सर्दी, खोकला, टायफाईड, काविळच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. शहरातील सर्वच दवाखाने रुग्णांनी फुल्ल दिसत आहेत. डेंग्यूने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. जागोजागी कचऱ्याची पडलेली ढीग व त्यावर उत्पन्न होणारी जिवजंतू यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.
तुळजापूर नरपरिषद प्रशासनाची मात्र डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे नालेसफाई करणे, अळीनाशक फवारणी करणे , शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी, डास प्रतिबंधाच्या दृष्टीने पालिकेने अद्याप कोणत्याही हालचाली सुरू केल्या नाहीत. पालिका प्रशासनालाकेंव्हा जाग येईल का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
