तुळजापूर प्रतिनिधी
रुक्मिणी माता भिष्मक राजाची कन्या होती. ती लहानपणापासून भगवंताबद्दल श्रवण करत होती. भिष्मक राजाच्या राजदरबारात श्री नारद मुनी सतत येत असत व कृष्ण कथा सांगत असत तेव्हा रुक्मिणी माता कृष्ण कथा ऐकत असत. सतत कृष्ण कथा ऐकून ऐकून त्यांना कृष्णाबद्दल प्रेम उत्पन्न झाले त्यानंतर रुक्मिणी मातेचा आणि कृष्णाचा विवाह झाला.
"जो व्यक्ती सतत कृष्ण कथा श्रवण करेल,त्याला कृष्ण प्रेम प्राप्त होईल व आयुष्याच्या शेवटी त्याला भागवत प्राप्ती होईल." प्रभुजींनी सुदामा चरित्र सांगितले. मैत्री कशी असावी तसेच कोणत्या व्यक्तीसोबत मैत्री करावी, हे सुदामा चरित्रावरून आपण शिकू शकतो. मित्र हा नशापन करणारा नसावा, तसेच नशापान करायला शिकवणारा नसावा. मित्र हा वाईट व्यसन करायला शिकवणारा नसावा, तर मित्र हा भगवत शरणागती घ्यायला लावणारा असावा,मित्र हा हरिनामाचा आश्रय घ्यायला लावणारा असावा असे प्रभुजींनी सांगितले.
कथेनंतर ग्रंथाची शोभायात्रा, हरिनाम संकीर्तन व महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी 1200 ते 1400 भाविक भक्त उपस्थित होते.
