तुळजापूर प्रतिनिधी
तुळजाई नगरीत श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्ताने नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारासह पत्रकार अनिल आगलावे, नायब तहसीलदार मनोरमा प्रकाश गाढे, शिक्षण विस्तार अधिकारी मल्लिनाथ काळे,निवृत्त बँक कर्मचारी शहाजी बडोदकर यांना यंदाचा नाभिक समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कुंभार गल्ली कार पार्किंग शेजारील श्री संत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहाच्या नियोजित जागेवर गुरुवार २९ रोजी सायंकाळी ६ वाजता महंत तुकोजी बुवा,महंत मावजीनाथ बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत सेना महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. शुक्रवार ३० रोजी अनिकेत राऊत महाराज यांची काल्याचे किर्तनसेवा संपन्न झाली, दुपारी महाप्रसादानंतर सायंकाळी ४ वाजता अमर चोपदार,श्रीकांत कदम,सचिन ताकमोघे यांच्या हस्ते आरतीने पुण्यतिथी सोहळ्याची सांगता झाली.
याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,अशोक जगदाळे,धीरज पाटील,सचिन रोचकरी,विनोद गंगणे,आनंद कंदले,अभिजित चव्हाण,ऋषीकेश मगर,अमर चोपदार,अविनाश गंगणे, राम चोपदार, अमर हंगरगेकर,विजय कंदले,अमोल कुतवळ,नरेश अमृतराव,अजित परमेश्वर,विशाल रोचकरी आदींसह नाभिक बांधवांची उपस्थिती होती.
नाभिक समाजाच्या कायमस्वरूपी पाठीशी - मधुकरराव चव्हाण
नाभिक समाज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खांद्याला खांद्या लावून स्वराज्यासाठी लढणारा लढवय्या समाज आहे. श्री संत सेना महाराज यांनी केलेले प्रबोधनाचे कार्य अविस्मरणीय आहे, तुळजापूर तालुक्यातील नाभिक बांधवांच्या प्रत्येक अडीअडचणीत मी कायम स्वरूपी पाठीशी राहील असा शब्द माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यावेळी दिला.
नाभिक समाज भक्तनिवास लवकरच उभारू - आमदार राणा पाटील
नाभिक समाज हा सामाजिक बांधिलकीसह सेवाभाव जपणारा असून तुळजाई नगरीत कुंभार गल्लीतील नियोजित जागेवर लवकरच सुसज्ज असे भक्तनिवास उभारून राज्यभरातील नाभिक बांधवांसाठी हक्काची व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,तसेच गतवर्षी 10 लाख आणि आता यावर्षी 15 लाख रुपये आमदार निधीतून याकामी उपलब्ध देणार असा आशावाद आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त शहाजी कावरे व अनिल आगलावे यांचा आमदार पाटील यांनी सत्कार केला.
नाभिक बांधवांना आधार देऊ - अशोक जगदाळे
तुळजापूर येथील संत सेना महाराज भक्त निवासासाठी सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनी पक्ष भेद विसरून नाभिक समाजाला मदत करावी,
नाभिक समाज प्रत्येक गावात आपली दैनंदिन सेवा बजावतो, समाजातील छोट्या मोठ्या अडचणी असतील किंवा काही आर्थिक विषय असतील याबाबत आपण वैयक्तिक मदत करू तसेच या समाजाला कधीही अंतर देणार नाही असे मत उद्योजक अशोक जगदाळे यांनी यावेळी व्यक्त केले.
