Bull's Nest | बैल पोळा

mhcitynews
0

भारतामध्ये अनेक जाती, धर्म आणि पंथाचे लोकं राहतात. त्यामुळे आपल्या देशात नेहमीच विविध सण साजरे केले जातात. मुख्य म्हणजे आपल्या देशात आणि धर्मात आपण तर विविध सण साजरे करतो, मात्र सोबतच आपल्या पशु पक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. हा महिना म्हणजे सणांचा राजा. अतिशय पवित्र महिना म्हणून श्रावणाला ओळखले जाते. विविध सण-उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण महिना आता लवकरच संपणार आहे. या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सण ओळखला जातो. या सणाला देखील विशेष महत्त्व आहे. यानंतर भाद्रपद महिना सुरु होऊन गणपती बाप्पा येतात.


संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण बैलपोळा नावाने साजरा केला जातो. आपला देश कृषीप्रधान असून, शेतकरी हा आपल्या देशाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्वच शेतकऱ्यांचा जिवाभावाचा मित्र म्हणून बैलाला ओळखले जाते. याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पिक पिकवण्यासाठी मोठी मदत होते. त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा साजरा करण्याची पद्धत आहे.


या दिवशी बैलांना जेवणासाठी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. त्यांची मिरवणुक काढतात. घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात. या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.


संपादक.....

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top