तुळजापूर प्रतिनिधी
वृक्ष दिंडी वृक्ष माझा श्वास । वृक्ष माझा प्राण। आन बान शान । वृक्षांसाठी ॥ वृक्षांचा सांगावा । प्रेमाचा विसावा ।। आनंदाचा ठेवा । ... या वचनाप्रमाणे येथील श्री राजा शिवछत्रपती क्रीकेट क्लब तर्फे युवा उद्योजक राहुल भोसले यांच्या हस्ते तुळजापूर ते नळदुर्ग रोडवरील डोंगर परिसरात १०० रोपांची लागवड करण्यात आली. तुळजापूर येथील नळदुर्ग रोड परिसरातील हेलिपॅडच्या मागील डोंगरावर जवळपास १०० झाडे लावण्यात आली आहेत.
यावेळी राजा शिवछत्रपती क्रीकेट क्लबचे विपीन शिंदे, सचिन शिंदे, नितीन सुर्यवंशी, सुदर्शन वाघमारे, बबलु सरवदे, ऋषिकेश साळुंके यांच्यासह पदाधिकारी, सदस्य यावेळी वृक्षारोपणात सहभागी झाले होते.
