" लाडकी बहीणीसाठी " सुनील रोचकरी यांचा स्तुत्य उपक्रम

mhcitynews
0

 15 ठिकाणी केली झोक्याची व्यवस्था 


सिद्दीक पटेल 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत महिलांना पारंपारिक झोके खेळण्याचा आनंद मिळावा म्हणून माजी नगरसेवक सुनील ( पिंटू ) रोचकरी तसेच त्यांच्या पत्नी प्रियांका रोचकरी यांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी पंधरा झोके बांधण्याचा उपक्रम राबविला आहे.

       

शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये कासार गल्ली , साळुंके गल्ली, शुक्रवार पेठ यासह विविध भागात 15 झोके महिलांसाठी नागपंचमीनिमित्त बांधलेले आहेत. यामुळे तुळजापूरकरांना विशेषतः महिलांना, मुलींना नागपंचमीनिमित्त झोके खेळण्याचा आनंद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top