आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा; सावरगावात तब्बल १७ वर्षांनी माजी विद्यार्थी आले एकत्र

mhcitynews
0


स्नेह मेळाव्यात मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद उसाळून वाहत होता


तुळजापूर प्रतिनिधी

आवडे मज मनापासून शाळा, लावीते लळा जशी माऊली बाळा, शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराचे शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते, ज्या शाळेत आपण शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे, याच पार्श्वभूमीवर सावरगाव जिल्हा परिषद शाळेतील २००६-७ मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थ्यांचा शनिवार (दि. ९) रोजी स्नेह मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते, स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले, माजी विद्यार्थी उमेश कदम, शंकर माळी, सुरेश तानवडे,विजय बोबडे,पल्लवी पाटोळे यांनी पुढाकार घेवून या मेळाव्याचे आयोजन केले होते, सावरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी जवळ १७ वर्षानंतर एकमेकांना भेटले, त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला , अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱयावर आनंद ओसंडून वाहत होता,प्रथम पाथरुट सर , संदीप वाघ सर , श्रीमती कुंभार मॅडम,रमाकांत गुरव सर, हरिदास मुळे सर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले, यावेळी संदीप वाघ ,पाथरूड सर यांनी मनोगत व्यक्त करत आयोजित स्नेह मेळाव्याचे गौरव उद्गार काढले , तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले ,आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्याबरोबर शिक्षक ही भाऊक झाल्याचे दिसून आले , प्रत्येक जण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब काडगावकर यांनी केले तर उमेश कदम यांनी आभार मानले.


४५ माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यात सहभागी...


गीताश्री सुरवसे, सारिका पवार, श्वेता भिंगारे, आशा पाटील, पल्लवी पाटोळे, संध्या महामुनी, पूनम पाटील, सुदेशना दरेकर, माधुरी पवार ,दिपाली पाटील, मीरा धामणे ,रेश्मा तानवडे ,पल्लवी फंड , श्वेता भिंगारे, लता बिरगे, अश्विनी तोडकरी,आशाबा शेख , जुबेरिया शेख,

शंकर राऊत ,शिवाजी राऊत, संतोष जाधव, नागेश धडके, नरहरी दरेकर, राहुल वाकळे, अमोल माळी, सुरेश तानवडे, विष्णू माळी ,अविनाश शिंदे ,बाळू करंडे ,अजित तोडकरी, राहुल तानवडे ,नवनाथ तानवडे ,योगेश माळी, महादेव गाभणे, उमेश धोत्रे, रामेश्वर ताटे ,तानाजी चौधरी, शत्रुघ्न माळी ,सचिन डोलारे, प्रमोद फंड, सागर पवार हे माजी विद्यार्थी उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top