राज्य सरकारचा मोठा निर्णय | आता इतक्या हजाराचा दंड भरावा लागणार

mhcitynews
0

 

सिटी न्यूज वार्ता 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती. या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभाग यांच्या करिता हे निर्णय घेण्यात आले आहेत. 


मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.


दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top