स्व.धन्यकुमार (काका) क्षिरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिरात एकूण 53 रक्तदात्यानी केले रक्तदान

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

माजी उपनगराध्यक्ष स्व.धन्यकुमार (काका) क्षिरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी बुधवार दि. 25 रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले युवा नेते दिनेश (आण्णा) क्षिरसागर यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन विश्वास नगर आयोध्या नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी विजय नवले सर, दीपक अण्णा महामुनी, तुकाराम मुळे साहेब, नारायण मरळ सर, हनुमंत दरेकर, प्रवीण नाडापुडे, सज्जन जाधव, विजय बोधले, सुरज गायकवाड, मनोज सावंत, नंदकुमार हाजगुडे, अजय कांबळे, सुजित तोडकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्याकरिता माझा आनंद प्रतिष्ठान चे अतुल सोमवंशी, आनंद औटी, रोहित दरेकर, संकेत घोगरे, आनंद शिंदे बालाजी पवार यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top