भारतीय बौद्ध महासभा तुळजापूर तालुका नूतन कार्यकारिणीचे गठन व पदाधिकाऱ्यांचे सत्कार संपन्न

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

शहरातील आनंद बुद्धविहार येथे भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उस्मानाबाद तालुका नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी दिनांक २२ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोषाध्यक्ष कुमार ढेपे, संस्कार जिल्हा उपाध्यक्ष विजय अशोक बनसोडे, पर्यटन जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पंडागळे, जि. ऑडिटर डॉ. प्रा. विवेकानंद वाहूळे, जिल्हा संघटक बाळासाहेब बागडे, जिल्हा संघटक सुकेशण ढेपे, बौद्धाचार्य गुणवंत सोनवणे, जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड उमरगा, यांची ही या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती.


उस्मानाबाद तालुका नूतन कार्यकारणी निवडीच्या बैठकीची सुरुवात जिल्हाध्यक्ष राजश्री कदम व जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . तसेच या बैठकी दरम्यान भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीवर काम करू इच्छिणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फॉर्म भरून घेणे, त्यांच्या मुलाखती घेणे आणि सर्वानुमते सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणे इत्यादी सोपस्कार पार पडले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका तुळजापूर नूतन कार्यकारणी मध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. ता.अध्यक्ष वैभव शिरसाठ, ता. सरचिटणीस राकेश जेटीथोर, ता. कोषाध्यक्ष चंद्रकांत अण्णाप्पा दुपारगुडे, ता.संस्कार उपाध्यक्ष विठ्ठल भिका सुरते, संस्कार सचिव सचिन सुग्रीव सोनवणे, संस्कार सचिव उमेश रमेश पांडागळे, ता. पर्यटन उपाध्यक्ष कैलास गवळी, पर्यटन सचिव शिवराम दिगंबर भंडारे, पर्यटन सचिव गौतम सोनवणे, संरक्षण उपाध्यक्ष रामेश्वर भिमराव चंदनशिवे, संरक्षण सचिव मुरलीधर दिगंबर भंडारे, संरक्षण सचिव शरद भिमराव बागडे, ता. महिला उपाध्यक्ष लक्ष्मी महेश कदम, ता.संघटक संकेत गोपाळ दिलपाक, प्रशांत दत्तात्रय गोरसे, अविनाश लक्ष्मण भगत, अनंता रामा कांबळे या सर्वांची भारतीय बौद्ध महासभा तालुका तुळजापूर नूतन कार्यकारिणीत निवड जिल्हाध्यक्ष राजश्री कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली. या कार्यकारिणी निवडी बैठकीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल सुरते यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन आता सैनिक दलाचे उपाध्यक्ष रामेश्वर चंदनशिवे यांनी मानले. या नूतन कार्यकारिणी निवड कार्यक्रमास उस्मानाबाद तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top