तुळजापूर प्रतिनिधी
गेलं दोन-तीन दिवसापासून काही वृत्तवाहिनीवर मधुकरराव चव्हाण भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश करणार असे वृत्त येत आहे. हे खोटे असून मी कुठेही जाणार नाही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. तालुक्यातील जनतेचा वाढता पाठिंबा पाहून विरोधक संभ्रम पसरत आहेत. अशी माहिती माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बुधवार दि.२५ रोजी तुळजापूर येथील विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळेस माजी जि.प.सभापती मुकुंद डोंगरे, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड माजी नगरसेवक सुनील रोचकरी, युवा नेते ऋषिकेश मगर, भालचन्द्र मगर व बबन जाधव, चिन्मय मगर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले की, सध्या सराटी मध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसले असून सरकार मात्र कोणतीही दखल घेत नाही. याची सर्वस्व जबाबदार सरकार असेल, पाच वर्षांमध्ये तुळजापूर विधानसभेचा किती विकास झाला ? माझ्या काळात मी १०० खटाचे जिल्हा उपरुणालय उभे केले. गाव तेथे तलाव केले तसेच बोरी धरणातून पाणीपुरवठा करणारी नवीन पाईप लाईन केली. येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक असून तशी सर्वच स्थरातील लोकांचा वाढता पाठिंबा मिळत असून, जाहिराती करून विकास होत नाही, मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मतदारांसमोर जाणार असल्याचे चव्हाण म्हणाले.

