आ. राणाजगजीतसिंह पाटलांनी नागरिकांशी साधला विकासात्मक संवाद

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

शहरातील दशावतार मठ येथे श्री तुळजाभवानी मंदिर व परिसराच्या विकासात्मक विषयावर चर्चा करण्यासाठी परिसरातील सर्व पुजारी, व्यापारी आणि नागरिकांसोबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शनिवार दि. 31 रोजी बैठक घेत संवाद साधला.


बैठकीमध्ये मंदीर परीसरातील दगडी पायर्‍या तसेच लोखंडी गेट काढणे संदर्भाने महत्वाची चर्चा झाली. शुक्रवार पेठ भागातील सुरेख स्मृती येथे पार्कींगची सोय व्हावी, तसेच १२४ भक्त निवास भाविकांसाठी चालु करावे याबाबत पुजारी बांधवांनी प्रामुख्याने मागणी केली. तसेच शहरातील आठवडा बाजार हा मंगळवारी न भरवता तो बुधवारी व्हावा जेणे करुन भाविकांचे हाल होणार नाहीत, अशी देखील मागणी करण्यात आली. 

बैठकी दरम्यान मंदीराकडील पायर्‍या, गेट काढण्याबाबत तात्काळ मुख्याधिकारी यांना आदेशीत केले तसेच तेथे जाऊन पाहणी केली. शुक्रवार पेठ परीसराची देखील पाहणी यावेळी केली. तेथे होणाऱ्या अद्यावत भक्त निवासाचे संकल्प चित्रही बैठकी दरम्यान पुजारी, व्यापारी, युवकांना दाखवण्यात आले.

यावेळी महंत माऊजीनाथ महाराज, युवा नेते विनोद गंगणे, मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, बाळकृष्ण कदम, अविनाश गंगणे, आनंद कंदले, शांताराम पेंदे, शिवाजी बोधले, सुहास साळुंके, नरेश अमृतराव, राजेश्वर कदम, तानाजी भोसले, विजयकुमार नवले, दिवाकर शेळके, दत्ता क्षीरसागर, विजय भोसले, किरण अमृतराव, विजय क्षीरसागर, रत्नदीप भोसले, आबासाहेब पेंदे, विश्वास भोसले, विनोद सोंजी, शुभम क्षीरसागर सह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, शुक्रवार पेठ, खडकाळ गल्ली, साळुंके गल्ली, भोसले गल्ली, कणे गल्ली भागातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top