तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील पुजारी नगरचा राजा गणेश मंडळाच्या वतीने येथे भव्य रांगोळी स्पर्धा आज आयोजित करण्यात आली होती, पहिल्याच वर्षी मंडळ महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रम राबवत असून.
शनिवार दि. 14 रोजी आयोजित रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी साकारलेल्या रांगोळीने सर्वांचे मन मोहून टाकले होते. एकूण 30 युवती व महिलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. उद्या दि. 15 रोजी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात येणार असून या मध्ये स्पर्धकांना आकर्षक असे बक्षीस ठेवण्यात आले असून यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान आयोजका कडून करण्यात आले आहे. तसेच सोमवार दि. 16 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
