पद असो किंवा नसो शेतकऱ्यांसाठी सदैव कार्यरत राहणार

mhcitynews
0


बेंबळी येथील शेतकरी मेळाव्यात अशोक जगदाळे यांचे प्रतिपादन 

तुळजापूर प्रतिनिधी

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी गावात, गुरुवार २६ सप्टेंबर २०२४ रोजी अशोक जगदाळे आयोजित शेतकरी मेळाव्यात, सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख आणि ऊस शेतीतज्ञ डॉ.संजीव माने यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. 


तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील कृतिशील व्यक्तिमत्व ,शेतीचा विकास हाच ध्यास घेऊन जगणारे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणारे,भावी आमदार म्हणून परिचित असलेले अशोक भाऊ जगदाळे यांच्यातर्फे बेंबळी येथील वेलकम मंगल कार्यालयात  (२६ सप्टेंबर) भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख आणि कृषिरत्न तथा ऊस उत्पादन तज्ञ डॉ. संजीव माने यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. यावेळी उपस्थित मान्यवर मा.अशोक (भाऊ) जगदाळे, जिवन बरडे, बाळासाहेब माने, सत्तार शेख, बाळासाहेब कणसे, इमरान पठाण, दिनेश हेडा, श्यामसुंदर पाटील, राजाभाऊ नळेगावकर, शंकर सुरवसे, फजल शेख, नवनाथ क्षीरसागर, अमर माने, प्रविण पांधरे,  विनोद पाटील, गणेश सावळकर, आदीजण उपस्थित होते. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवाला मा. श्री. अशोक जगदाळे यांच्याकडून शेती उपयोगी साहित्य देण्यात आले. तसेच 51 भाग्यवान शेतकऱ्यांना  लकी ड्रॉच्या माध्यमातून शेतीसाठी लागणारे उपकरण आणि साहित्य भेट म्हणून देण्यात आले. 

 


मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती प्रश्नासाठी हा भव्य मेळावा आयोजित केला होता. या  मेळाव्याला बेंबळी आणि आसपासच्या  दहा‌ ते‌ बारा गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. आमदार झाल्यास, सध्या देशातील शेती आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे, शेतमालाला भाव नाही मतदारसंघात विम्याचा आणि सोयाबीनच्या भावाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. काल परवा झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेलं पीक हिरावून घेतलंय, म्हणून सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी असे प्रतिपादन अशोकभाऊंनी यावेळी सांगितले. या मेळाव्यात पंजाबराव डख  यांनी मराठवाड्यात पुढील काळामध्ये कशा पद्धतीचे वातावरण असेल, शेतकऱ्यांनी पेरणी करताना काय काळजी घ्यावी तसेच हवामान कसे ओळखावे पाऊस कधी आणि किती होणार यासंदर्भातले मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले. तसेच सांगली येथील ऊस शेती तज्ज्ञ डॉ. संजीव माने यांनी मराठवाड्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या ऊस शेतीबद्दल सांगितले. यात मातीचे परीक्षण का महत्वाचे आहे, पेरणी पासून ते काढणीपर्यंत काय काय काळजी घ्यावी तसेच संभाव्य रोगांची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऊस लागवड करताना उसाचे उत्पादन कसे वाढवावे यासंदर्भात शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी मेळाव्यासाठी बेंबळी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची  हजारोंच्या संख्येत उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top