माजी खासदार कांबळे उमरगा लोहारा विधानसभा लढणार

mhcitynews
0


लोहारा  प्रतिनिधी

उमरगा लोहारा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षा कडून इच्छुक उमेदवाराचे दौरे सुरू असून पक्षाकडून माजी खासदार शिवाजीराव ( बापू ) कांबळे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याने त्यांचा उमरगा व लोहारा तालुक्यात संपर्क दौरा सुरु केला असून यात त्यांना जनतेतुन उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे, त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांच्या पक्षाकडून तिकीट मिळाल्यास ते निवडणूक लढवणार असल्याचे लोहारा येथील पत्रकार परिषदेत सांगितले, यावेळी खासदार शिवाजीराव कांबळे यांना स्व बाळासाहेब ठाकरे यांनी सलग दोन वेळा खासदार कीचे तिकीट दिले होते, नंतर ते सलग दोन्ही वेळी विजयी झाले होते, पण नंतर काही काळात त्याच्या काही तांत्रिक अडचणी मुळे त्यांनी तिसऱ्या वेळी माघार घेतली होती, त्या प्रदीर्घ काळानंतर ते पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत, त्यांना ह्या दोन्ही तालुकाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली तर ते निश्चितच दोन्ही तालुक्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत असे यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top