तुळजापूर प्रतिनिधी
कमान वेस विभागातील जय अंबिका मंडळ यांच्या वतीने रूढी परंपरे नुसार पुजारी बांधव यांच्या वतीने श्री देवी विजयग्रंथ वाचन करून तुळजाभवानीचे माहात्म्य या ग्रंथात आहे.ते आत्मसात करण्याची परंपरा आहे.त्याची समाप्ती ही कालाष्टमीला केली जाते त्या निम्मित आई तुळजाभवानी मातेस सिंहासन पूजा करून अन्नदान करू श्री देवी ग्रंथ समाप्ती करण्यात आली.शहरातील शुक्रवार पेठ,खडकाळ गल्ली, जवाहर गल्ली,कमान वेस भागात सर्व पुजारी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात .पूर्वापार प्रथा आहे. ती आजही कायम आहे.या समाप्ती निम्मित सिंहासन पूजा, अन्नदान करण्यात आले.या साठी मंडळाचे अध्यक्ष किरण लोंढे,नाना पेंदे,बाळासाहेब कदम,रमाकांत लोंढे,विक्रम कदम,श्रेणिक मुकेरकर,बर्वे,अजित काठेवाड, चिवचिवे,गणेश कदम अमोल लोंढे हे सिंहासन पूजेसाठी व आनंदासाठी उपस्थित होते.
